पुन्हा तिच कशी होऊ
पुन्हा तिच कशी होऊ
थकल्या पावलाना कसं चालवू
विरल्या नात्यात गंध कसा भरु
झाले गेले सांग कसं विसरु
पुन्हा कशी सांग तिच सुरवात करु
थिजल्या आज त्या रेशीम गाठी
भिजल्या नयनी स्वप्न कसंपाहू
झाले गेले सांग कसे विसरू
पुन्हा हास्य जीवनी कसं रुजवू
ऋतू बदल हे सारे माझ्याच साठी
ओळख अशी कितिदा मी बदलू
झाले गेले सांग कसे मी विसरु
पुन्हा एकदा तिच मी कशी होऊ
दर्पणात एक रेघ ती उमटली
छबीत माझ्या भेग ती कशी साहू
झाल गेल सांग कसं विसरु
पुन्हा एकदा तिच चूक का करु
विरळ झाल्या सावल्या उन्हातल्या
सांजेला गारवा साठी का मी झुरू
झाल गेल सांग कसं मी विसरु
पुन्हा तिच सावली मी कशी होऊ
भेगळल्या भुईपरी जिण जिव्हारी
घास गोठता अंतरी खोट कस हसू
झाल गेल सांग कसं मी विसरु
पुन्हा तेच समाधान सांग कसं मानू ...
झाल गेल सांग कसं विसरु
पुन्हा तेच जगण उरी कस मारु
वळणावर पाऊलखुणा मिटवुनी
परतुनी तेच चित्र मनी कस रंगवू
संपल ते स्वप्न मनीचं आज जरी
श्वासात आश्वासनं कोणत जगू
झाल गेल विसरुनी जगले जरी
पुन्हा तेच स्वरुप सांग कसं मी लेवु...
मनाच्या गर्तेत अडकत जातो
अंतरीची ओळखीस न्याय कशी देवू
झाल गेल विसरुनी जगाव मी
पुन्हा वाट आंधळी सांग कशी चालू

