पुन्हा नव्याने...
पुन्हा नव्याने...
शांततेत या होईल
तीव्र स्वर टाचणीचा
असे असून सामोरे
निसटेल क्षण भेटीचा
साक्षीदार गंध असे
बहरल्या सायलीचा
संवादाला आपुल्या
सुवास आठवणीचा
करी घायाळ ह्रदया
बाण चोरटा नयनीचा
काय अडते नेमके
ठाव नसे ह्या मनीचा
तुच दडलासे तेथे
आभास चंद्राकृतीचा
पुन्हा दरवळ येतो
तुझ्या अबोल प्रितीचा

