STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Others

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Tragedy Others

पुन्हा जन्माला यावे

पुन्हा जन्माला यावे

1 min
258

निधन वार्ता ऐकून साहेब

खरंच श्वास माझा थांबला,

महाराष्ट्राचे दैवत हरपले

हा तारा अचानक निखळला...


वाटलं होतं भाग्य उजळले

मुख्यमंत्री तुम्ही होणार,

रामराज्य अवतरेल येथे

चांगले दिवस खरंच येणार...


खिन्न झाली मती जगाची

तुमच्या अचानक जाण्याने,

कळले नाही कुणास काही

घडले कसे, काय ते देव जाणे...


श्वास होतात तुम्ही जनांचा

तुम्हीच खरे लोकनेते,

खरंच सांगतो साहेब तुम्हा

आठवण आम्हा रोज येते...


तुमचे विकासाचे स्वप्न

साहेब साकार व्हायला हवे,

आम्हा वाटते रोज मनातून

साहेब पुन्हा तुम्ही जन्मास यावे...


या साहेब जन्मास पुन्हा

तुम्ही घेऊन पुन्हा नवा अवतार,

उद्धारक तुम्ही दिन जनांचे

नाहीत फिटणार तुमचे उपकार...


या साहेब जन्मास पुन्हा

आम्ही सारेच तुमचे ॠणी,

कोटी कोटी वंदन तुम्हा

आज पुण्यतिथी दिनी...


गेला देवा आमचा नाथ

झालो आम्ही अनाथ,

होता प्रकाशाचा किरण

पडलो खितपत अंधारात.


कशी काळरात्र झाली

नाही आम्हा कोणी न वाली,

हृदयात आठवण, डोळ्यात पाणी

मी वाहतो श्रद्धांजली...!


तुमच्या जाण्याने आम्हावर

वेळ वाईट फार ही आली,

दुःखी अंतःकरणाने वाहतो

मी भावपूर्ण श्रद्धांजली...!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy