STORYMIRROR

SWATI WAKTE

Tragedy

3  

SWATI WAKTE

Tragedy

पुलवामा

पुलवामा

1 min
760


आम्ही साजरा करत होतो व्हॅलेंटाईन

भारतीय सैनिक करत होते देशाचे रक्षण


आम्ही करत होतो फुलांची चॉकलेटची देवाण घेवाण

भारतीय सैनिकांच्या वाटेवर आले बॉम्बचे आव्हान


आम्ही खूपच होतो खुशीत

पण ते बेसावध सैनिक गेले मृत्यूच्या कुशीत


सर्व म्हणाले भ्याड हल्ले केले कुणी

त्यांना लढायचीही संधी नाही दिली कुणी


धिक्कार असो त्या पाप्यांचा

ज्यांनी केला चुराडा सैनिकांच्या स्वप्नांचा


विसरले सारे सैनिकांनाही असतील मन काही स्वप्न

तरुण वयात द्यावे लागले त्यांना नाहक बलिदान


नाही माफी त्या पाप्यांना

न्याय मिळालाच पाहिजे जवानांना


हल्ला झाला हा पुलवामाला

पुनरावृत्ती नको त्या कामाला



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy