पुलवामा शहीद दिन🌹🙏
पुलवामा शहीद दिन🌹🙏
दहशदवादी होते टपलेले
केला त्यांनी हल्ला जवानांवर।
झोपेत धोंडा घातला त्यांनी
भ्याड कृत्याने आघात मनावर।
तरी नाही डगमगले जवान
दिले उत्तर भ्याड कृत्याला ।
चाळीस जवान ठार झाले
थोर सुपुत्र ते देशाच्या रक्षणाला।
नाही केला विचार कशाचा
शहिद झाले अमर जवान।
त्यांचे बलिदान नका विसरू
त्यांनीच राखली आपली शान।
पुलवामा शहिद दिन आज
साजरा करू सन्मानान।
थोर आईचे ते शूर पुत्र
गाऊ कौतुकाने त्यांचे गुणगान।
