STORYMIRROR

Vijay Sanap

Tragedy

3.3  

Vijay Sanap

Tragedy

पुलवामा भ्याड हल्ला

पुलवामा भ्याड हल्ला

1 min
954


पुलवामा भ्याड हल्ला


कशी साधली रे संधी

वीर असता झोपेत

झाले देहाचे तुकडे

केला दुष्मनाने घात ।।


रक्त मांसाचा चिखल

साऱ्या जीवाच्या चिंधड्या

वीर बांधे तिरंग्यात

माय भूमी आल्या गाड्या ।।


दिसे गाडीचा सांगाडा

जसा काळोख दाटला

वाहे रगताचा पूर

झरा प्रेमाचा आटला ।।


आता पापी पाकड्यांनो

नाही तुमची रे खैर

आम्ही घेऊन बदला

देऊ दाखवून वैर ।।


भाषा टाकू रे चिरुन

मुखी येणाऱ्या गर्वाची

मस्ती जिरेल तेव्हाच

त्याच काळी या सर्वांची ।।


माज चढला तुम्हाला

खाता भारताचे ऊष्ट

टाकू संपून अस्तित्व

देतो वार्निंग हीे लाष्ट ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy