पर्यावरणदिन
पर्यावरणदिन
मोल जाणू पर्यावरणाचे
करू या रक्षण पृथ्वीचे
घाण ,कचरा, नष्ट करू
जाणू मोल जीवनाचे.....!!
समुद्र, सागर, नद्या, ओढे
थेंबे थेंबे तळे साचे
पाण्याचा जपून वापर कर
मोल जाण तू पाण्याचे.....!!
नैसर्गिक गोष्टीला नकोच बाधा
झाडे लावा झाडे जगवा
वृक्षसंवर्धन, वृक्षसंगोपन
गोष्ट ही ध्यानी ठेव मानवा...!!
जंगलतोड बस कर आता
करू या रक्षण पर्यावरणाचे
पर्यावरण जर ढासळले तर
पहा रौद्र रूप निसर्गाचे.....!!
राखावयाचा जर समतोल असेल
पर्यावरणाचे करू रक्षण
निसर्गाला जर दिलास धोका
तोच करेल मग तुझेच भक्षण...!!
