STORYMIRROR

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

3  

Sanjay Raghunath Sonawane

Abstract Inspirational Others

पर्यावरण - गीत

पर्यावरण - गीत

1 min
234

अहो,अहो तुम्ही ऐका 

   जंगलतोड थांबवा

   प्राणी,पक्ष्यावर दया करा

   निवारे त्यांचे वाचवा 

   पर्यावरणाचे नियम पाळा 

   जगाचा विनाश तुम्ही टाळा 


जीवसृष्टीला द्या जीवदान 

ती वाचविते आपले प्राण 

पर्यावरण आयुष्याची शिदोरी

वृक्ष लावा दारोदारी

पर्यावरणाचे नियम पाळा 

जगाचा विनाश तुम्ही टाळा 


नका करू जलप्रदूषण 

ओढवू नका मरण 

नका करू वायू प्रदूषण 

दमा,अस्थम्याला नको आमंत्रण 

पर्यावरणाचे नियम पाळा 

जगाचा विनाश तुम्ही टाळा 


नका करू पर्यावरणाचा घात 

होईल जीवनाची वाताहात 

हा विचार मनात रुजवा 

 प्रत्येकाच्या कुटूंबात 

पर्यावरणाचे नियम पाळा 

जगाचा विनाश तुम्ही टाळा 


नका करू ध्वनी प्रदूषण 

वय वृध्दांचे जातील प्राण 

करा विचार मानवाचा 

तुम्ही मुले,मुली बुद्धीवान 

पर्यावरणाचे नियम पाळा 

जगाचा विनाश तुम्ही टाळा 


पर्यावरण नका करू भकास 

जगाचा होत राहिल र्हास 

एका,एकाने ध्यानात ठेवा 

पृथ्वीचा करू नका हो नाश

 पर्यावरणाचे नियम पाळा 

जगाचा विनाश तुम्ही टाळा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract