परवड
परवड
कळस गाठला महागाईने, हाल जाले गरिबांचे.
सगळेच नेते झटत आहेत, परी कोन नाही कामाचे.
काळजी सगळ्यांना आहे, त्या लाचार मध्यम वर्गाची.
भासवत आहेत साऱ्या समोर, भरकट आहे साऱ्यांची.
शेतकरी तर मरतो आहे, नवीन नाही सारं.
पाऊस नाय पानी नाय, कर्जाच घूमतय वारं.
सगळ्या योजना कागदावर, पायपीटा होतो कार्यालयात.
शेतात घाम गाळून, रक्त आटवतो या वयांत.
जगाचा पोशिन्दा तू, आज राहतोय स्वतः उपाशी.
कारभाऱ्यानां आठवण येते, जेव्हा निवडणूक येते उराशी.
फक्त कागदावर कवितेत, अनं शब्दात राहिलाय मान.
कष्टकऱ्यालाच विचारताय, आहे का कष्टाची जान.
त्यालाही जगायचंय, म्हणून करतोय सारी धरपड.
दोन वेळेच्या भुकेपेक्षा, जगण्याची महाग परवड.
