प्रतीक्षा
प्रतीक्षा
सायंकाळी सांजवेळी
अशाच एका संध्याकाळी
अवचित येता तुझी आठवण
कातर कातर झालं मन
मेघ नभी ते दाटू लागले
मोती गाली ओघळू लागले
एकांती तव सहवास स्मरता
गात्रामधुनी रोमांच वाहता
मनी पल्लवी नवी आकांक्षा
त्याच क्षणांची पुन्हा प्रतीक्षा

