STORYMIRROR

AnjalI Butley

Inspirational Children

3  

AnjalI Butley

Inspirational Children

परत येण्या

परत येण्या

1 min
195

नाही थकलो मी दिवसभरातल्या तप्त उन्हात

लाली फाकली माझ्या भोवती परत येण्या उद्या

हसत खिदळत पक्षी हळुहळू घरट्यात परततात


फुल्यांच्या पाकळया मिटतात टवटवित परत उद्या फुलण्या

विसावा तुम्हाला मिळण्यासाठी जातो थोडा लांब

पण पाठवतो माझ्या पुत्राला काळजी तुमची घेण्या!


पिता पुत्र आम्ही कार्यरत असतो तुमच्यासाठी सदासर्वकाळ!

कधी काळी ग्रहण लागते, दुरावा थोडा काळ!

ह्या नभात असतात आमची काही भावंडे

ओळखताना तुम्ही त्यांना शुक्र, बुध, गुरु, शनि, मंगळ ह्या नावाने!


 आहे अजून ही असंख्य ग्रह तारे माझ्या दिमतीला तुमची काळजी घेण्या!

थकल्या नंतर तुम्ही बघता माझ्या सांजवेळेची

पण हळूच कानात सांगता ये परत उद्या सकाळी नविन ऊर्जा देण्यास!

अविरत तुझा प्रवास चालु असतो मला हसवण्या खेळवण्या, जीवनाच्या ह्या प्रवासात!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational