STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

प्रश्न...!

प्रश्न...!

1 min
17.9K


प्रश्न अनेक असतात

ज्या त्या वयात पडणारे

भोवती पिंगा घालणारे

उत्तराची अपेक्षा वाढवणारे

उत्तरासाठी थांबणारे

उत्तराची वाट पाहणारे


या प्रश्नांची उकल

फक्त दोन मार्गानेच होते

त्यासाठी अगदी निरागस

लहान व्हावे लागते

नाहीतर अनुभवी वृद्ध व्हावे लागते

या दोनच स्थितीत

योग्य उत्तर सापडते

प्रत्येक प्रश्नाचे मग कोडे सुटते

निरागसतेत प्रश्न पडतच नाही

आणि अनुभवाने प्रश्नच उरत नाही


प्रश्न गधे पंचविशीत किंवा

तारुण्यातच पडतात

कारण ते अहंपणात गुरफटतात

यशासाठी धडपडतात

अपयश पाहण्यास घाबरतात

म्हणून तर सारे प्रश्न अनुत्तरित राहतात


उत्तरापेक्षा प्रश्नाचीच भीती

अपयश पदरात टाकते

म्हणून तर सारे जीवन

प्रश्न सोडवण्यातच व्यर्थ जाते

प्रश्नच पडूनये असे वर्तन असावे

जणू उत्तराचे भयच निघून जावे....!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics