STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

प्रणय रंग पावसाचा

प्रणय रंग पावसाचा

1 min
280

पावसाळा गात आहे 

धुंद सारी रात आहे 


चिंब काया गार वारा 

खेळ हा रंगात आहे 


चुंबनांची चिंब वर्षा  

 ओठ हे ओठात आहे 


पेटलेले देह दोन्ही

 आग ही पाण्यात आहे


 पावसाला सांग प्रीती

 मी तुझ्या डोळ्यात आहे 


कोसळे पाऊस रात्री 

दोन प्रेमी न्हात आहे 


थंड आहे गारवा हा

 उष्णता श्वासात आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance