प्रज्ञावान लेक...........
प्रज्ञावान लेक...........
छोटीशी बाबाची परी
घेऊन पाटी बसली
लेखणीसह लिहीण्या
बाराखडी ती कसली
शिक्षणाची गोडी
तिच्या चेहऱ्यावर दिसली
अभ्यासाच्या सरावात
लेक समाधानाने हासली
परिस्थितीचा शिक्षणावर
फार परिणाम दिसतो
प्रज्ञावान लेकीला मग
मग पैसा मागे खेचतो
खूप असतात स्वप्न तीचे
शिक्षणात उत्तुंग भरारीचे
पण बरेचदा पैशामुळे
भाव मावळतात हिरीरीचे
पैशाअभावी कुणाच्याही लेकीचे
शिक्षण ना राहो अपुरे
हुशार लेकीच्या स्वप्नाला
एखादा मदतीचा हातही पुरे
सगळेच अशा विचारसरणीचे
नसतात ना म्हणूनच तर.......
काही लेकींचे शिक्षणाविना
उर्वरित आयुष्य जाते खडतर...
