प्रियांका
प्रियांका
विसरा आता सौम्य वागणे
विसरा आता ममता माया
हाती घेऊन शस्त्र सिद्ध व्हा
नको असे जर पुन्हा प्रियांका
नकोच आता पुन्हा निर्भया
कमाल ही निर्लज्जपणाची
परिसीमा ही क्रूरपणाची
वेळ नव्हे ही अन्यायाला,
निमुटपणाने सोसायाची
बलात्कारि निर्दय आरोपी
दया क्षमा का हवी तयांना
दिसल्या नसतिल काय तयांना
मुक्या कळ्या या तळमळताना
वखवखलेल्या नजरा त्यांच्या
आंधळ्या करा पूर्णपणाने
पुरुषत्वाचा माज उतरवा
फिरु द्या त्यांना षंढपणाने
हवि संरक्षक प्रज्वल ज्योती
हृदया हृदयामधे पेटती
स्त्री पुरुष हो घ्यावी आता
लढण्यासाठी मशाल हाती
