STORYMIRROR

Umendra Bisen

Romance

3  

Umendra Bisen

Romance

प्रिय तुझी अन् माझी

प्रिय तुझी अन् माझी

1 min
160

कीती हा तुझा अबोला

सखे सोड हा रूसवा

समजून घेवू दोघं

जपू नात्यांचं गोडवा.


तुझ्या ह्या रूसव्यामुळे

मन माझं हे दुखतं

अशा अबोल पणाने

माझं हृदय रडतं.


नातं प्रेमाचे प्रतिक

पुरे झालं आता राग्

प्रिये सोड हा रूसवा

आणि पुर्वी गत वाग्.


तुझा हसरा चेहरा

मला खूप आठवतो 

तुझ्या अशा रूसव्याने

जीव माझा घाबरतो.


सोड रूसवा फुगवा

आता गाऊ प्रेम गीत

दोघांनीही आनंदाने

छान रंगवूया प्रित.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance