प्रिय बायको
प्रिय बायको
छोटी मोठी भांडणे तर
नवरा बायकोत नेहमी होतं राहते
मग सांग ना गं बायको
तू अशी उठ सूट माहेरी का जाते.....
सकाळ पासून अजून मी
एक कप चहा नाही पिलो
किचन मध्ये वस्तू शोधून मी
पूरा रमता जोगी झालो..........
तू सोडून गेली तर बघ सखे
काय झाले तुझ्या नवऱ्याचे हाल
परत ये गं माझी बायको
तुचं आहेस माझ्या संसाराची ढाल......
तुझ्याशी वाद घालून खरचं
मी खूप मोठी चुक केलो
माझ्यातच चरबी जास्त आहे
सकाळपासून उपाशी मेलो......
माझ्या काळजातली मैना
तू आहेस गं खूपच गुणी
परत कधी भांडणार नाही तुला
ही गोष्ट ठेवीन माझ्या ध्यानी.......
तू नटूण थटुण तयारीत रहा
तुला घ्यायला येतो राणी
दोघं सुखाचा संसार करू
गात-गात प्रेमाचे जीवन गाणी.......

