प्रीतीचा क्षण खरा..
प्रीतीचा क्षण खरा..
हसता हसता तू जेव्हा
नायनांतून केला प्रीतीचा इशारा
सारेच पाश गळून पडले
उठला हृदयाचा पहारा
तू स्पर्शीता मज आपुलकीने
आला अंगावर शहारा
श्रावणसरीत बरसुनी आला
प्रीतीचा क्षण खरा...

