प्रीतीचा झरा
प्रीतीचा झरा
तुझ्या प्रीतीचा झरा
वाहतो का असा मंद
तुझ्या प्रेमात वाहने
एवढाच माझा छंद
तुझ्या या हृदयात
हळूच वसते आहे
प्रेमात तुझ्या मी
गालात हसते आहे
तुझ्या प्रेमाच्या रंगात
अजूनही रंगते आहे
हरवून जाते प्रीती
या छंदात दंगते आहे
तुझ्या हृदयात माझे
प्रेम सारखेच आहे
तुझ्यासाठी हे मन
प्रेमात गीत गात आहे