STORYMIRROR

Manda Khandare

Romance

3  

Manda Khandare

Romance

प्रीती

प्रीती

1 min
229

का फुलावी प्रीत ही

अशी माझ्या मनात

का दिसावी मूर्ती त्याचीच

अशी चरा चरात


डोळ्यात स्वप्न, ओठी नाम 

त्याचेच का स्मरावे

का रक्ता सम भिनावे 

त्याने असे नसा नसात


ठाई ठाई त्याचेच अस्तित्व 

का असे भासावे

गंध त्याचाच दरवळावा

का असा तना मनात


चांदण्यां मैफिलीत 

न्हाऊन असे निघावे

पहिल्या वसंतातिल प्रेम 

उमलावे जसे दवा दवात


काहूर उठता मनी का

स्मृती पटलावर तूच दिसावे

कान्हा तू अन् राधा मी दिसे 

मग कणाकणात...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance