STORYMIRROR

Vasudha Naik

Romance

4  

Vasudha Naik

Romance

प्रीत...

प्रीत...

1 min
280

तुझ्या आठवणीत

जीव हा गुंतला

तुझ्या प्रेमात

जीव मी वाहिला...


    भेट पावसाळी

    धुंद आलिंगनात

    त्या धुंद वाटेवर

    कर्दळीच्या बनात...


प्रीतवेडी मी राणी

ध्यानी मनी स्वप्नी

तुझ्याच आठवात

विविधरंगी ढंगात....


    फुलपाखरू मन

    माझं झालं

    पंख फुटले मला

     नभ छोटं झालं...


उधाणल्या भावनांना

ह्रदयाची आर्त साद

प्रीतवेडी मी सजना

आसक्त हा प्रमाद...


    आठवणींच्या फुलोर्‍यात

    आज पुन्हा फुलताना

     प्रीतवेडी होते पाहते मी

     मला पुन्हा जगताना...


हे जीवन सजना

तुझ्याचसाठी रे

हसते ,रडते मन

प्रीतीसाठी रे...

   

     माझ्या जीवनात

     आलास प्रीत घेवून

     प्रीतवेडी सजना मी

     संसारात गेले हरवून...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance