प्रेयसी पत्र
प्रेयसी पत्र
प्रेयसी,
तुझे ऐकून ते गोड शब्द
वाटेवर उभा मी पुन्हा झालो स्तब्द
स्पर्श तुझा अनमोल जसा
नव्या नात्यांचा तो गोडवा.....
पानांची ती पहिली पालवी
हृदयावर पडलेली तुझीच सावली
तूझ्या कवितेचे शब्द आहे मोती
माझी प्रशंसा फक्त धूळच खाती......
मी तर खेळतो फक्त हृदयाचा खेळ
काय करू ग मला आता फक्त तुझंच वेड
तुझे अबोल शब्द जणू माझ्या हृदयाच्या तारा
तुझं प्रेम माझ्या खऱ्या आनंदाचा पसारा....
तु फक्त प्रेमच बोलें
मी मात्र शब्द उठवले
मी फक्त तुझा वाटसरू
तू मात्र माझी कल्पतरू.......
तू माझ्या हृदयात येती
तुझे हजार रंग उधळून देती
तू आहे माझी गोड बाहुली
मी तर फक्त तूझ्या अश्रूचि सावली....
तुझ्या आठवणी मनात येती
जुन्या स्पर्शाला उजाळा देती
तू आहे माझ्या मनाची शोभा
मी मात्र तुझा काळा जिवलगा
मी आहे तुझा काळा जिवलगा....

