STORYMIRROR

Nagesh Dhadve

Romance

2  

Nagesh Dhadve

Romance

प्रेयसी असावी तुज्यासारखी.!

प्रेयसी असावी तुज्यासारखी.!

1 min
6.1K


जागेपणी स्वप्न दाखवणारी ,
तू नसताना भासवणारी,
डोळे बंद होताच
तुझ्यातलं प्रेम आठवणारी,
प्रेयसी असावी तुझ्यासारखी !

संकटात ठाम उभी राहणारी ,
स्वतःहून धीर देणारी,
हातात हात देऊन
मनातलं सगळं काही जपणारी,
प्रेयसी असावी तुझ्यासारखी !

माझ्या भावना समजणारी,
हो ला हो करणारी,
चुकलो तरी
नेहमीच हसून उत्तर देणारी,
प्रेयसी असावी तुझ्यासारखी !

जीवाचं प्राण करणारी,
आयुष्याला वेगळच वळण देणारी,
मी हारुन सुद्धा
नेहमीच स्वतःला जिंकवणारी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी !

-नागेश(nd)


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance