प्रेमकाव्य - अबोल प्रीत
प्रेमकाव्य - अबोल प्रीत
तुझा प्रेमालाप
करी सख्या धुंद
अबोल ती प्रीत
मनही बेधुंद
प्रीतीच्या अंगणी
मस्त दरवळ
बागडू प्रेमाने
रंग तू उधळ
फिरू मनसोक्त
घेऊ हात हाती
विसरू जगाला
या पुनव राती
केलास इशारा
नयनबाणांनी
गुरफटले मी
तुझ्या कटाक्षांनी
मोगऱ्याचा गंध
मोहवतो मला
मिठीत शिरता
चेतवतो तुला
हा परिसस्पर्श
होता ओठांवरी
शहारून गेले
उठे शिरशिरी

