प्रेमात मी तुझ्या...
प्रेमात मी तुझ्या...
प्रेमात मी तुझ्या पडावे असे की,
रूप तुझेच जागोजागी दिसावे..
प्रेमात मी तुझ्या जगावे असे की,
रोज तुलाच मी निहाळावे..
प्रेमात मी तुझ्या राहावे असे की,
तुझ्या नजरेत मी मला शोधावे..
प्रेमात मी तुझ्या खुलावे असे की,
माझ्यातल्या मीपणात मला तूच दिसावे..
प्रेमात मी तुझ्या थांबावे असे की,
मन माझे घेता गिरकी शेवटी येऊन
ते फक्त तुझ्याच जवळ विसावे...

