STORYMIRROR

Raakesh More

Romance Others

4  

Raakesh More

Romance Others

प्रेमात हृदय हरून बघ

प्रेमात हृदय हरून बघ

1 min
187

मित्रा जीवन खूप सुंदर आहे 

निर्मळ प्रेम करून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


मी झुरायला नाही सांगत तुला 

तिच्या आठवणींमध्ये 

मी देखावाही करायला नाही 

म्हणत चारजणींमध्ये 

वासनेच्या लवलेशापासून 

जरा बाजूला सरून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


जबरदस्तीने प्रेम मिळेल 

हा तुझा अट्टाहास आहे 

हा तर तूझ्या मनातील 

प्रेमभावनेचाच ऱ्हास आहे 

कधीतरी तिचं मन जाण 

प्रेमाची कास धरून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


तिलाही काही भावना आहेत 

त्याचा जरा आदर कर 

समजून घे प्रेमाची व्याख्या 

आणि प्रेम सादर कर 

शुद्ध प्रेमाचा महासागर 

कधीतरी तरून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


जिंकायला तिला ती काही 

खेळणं नाही समजून घे 

तिचीही काही स्वप्न आहेत 

त्याचा शोध अजून घे 

हृदयात तूझ्या तिच्याप्रती 

खरं प्रेम भरून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


वर्षाव कर प्रेमाचा 

तिलाही ते कळू दे 

तुझ्या प्रेमाची उंची समजून

मन तिचं हळहळू दे 

तिचं हृदय प्रेमाच्या 

श्रावणाने बहरून बघ 

जिंकण्याची जिद्द सोडून कधी 

प्रेमात हृदय हरून बघ


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance