प्रेमांकुर
प्रेमांकुर
कळले मला न केव्हा
जीव तुझ्यावर जडले
प्रेमाच बिज केव्हा तू
मनात माझ्या पेरले
तुझ्या प्रेमाच्या रंगात
अशी मी रंगले
समजेना सख्या मला
केव्हा प्रेमांकुर फुलले
या प्रेमाच्या रोपट्याला
मी आणखी फुलवते
कधी गालात हसते
कधी क्षणात लाजते
हरवले मी माझे भान
तुझ्या आठवणीत रमते
कळत नाही मला माझे
दिनरात कसे सरते