प्रेमाच्या दुनियेत
प्रेमाच्या दुनियेत
प्रेमाच्या दुनियेत
अवचित आलास
माझ्या जीवनाचा
भाग झालास।।
प्रेमाच्या दुनियेत
घर मी वसविले
माझ्या हृदय मंदिरात
तुला बसविले।।
प्रेमाच्या दुनियेत
मी वाहत गेले
तुझ्या समवेत
जीवन घालविले।।
प्रेमाच्या दुनियेत
आले चढ-उतार
तुझ्या समवेत राहीन
नाही घेणार माघार।।
प्रेमाच्या दुनियेत
आला बेधुंद गारवा
माझ्या मनी भरला
तुझ्या प्रेमाचा ओलावा।।
प्रेमाच्या दुनियेत
आहे एक नशा
तुला सोडून आता
राहू मी कसा।।