नातं
नातं
तुझं माझं नातं
साताजन्माचं
राहील असे
अखंड सौभाग्याचं...।।
तुझं माझं नातं
कायम विश्वासाचं
नाही आता कधी
आयुष्यात रुसायचं...।।
तुझं माझं नातं
निखळ मैत्रीचं
संसाराच्या वेलीवर
असंच बहरायचं...।।
तुझं माझं नातं
अबोल प्रीतीचं
गुपित असेच राहो
प्रेम नात्याचं...।।
तुझं माझं नातं
नदी आणि सागराचं
एकमेकांना असेच
सामावून घेण्याचं...।।