गुज प्रितीचे
गुज प्रितीचे
गूज प्रितीचे
असे कळले
जन्माचे नाते
आपले जुळले...
प्रीतीत मी
न्हाऊन गेले
तुझे भाव
मला कळले...
तव प्रीतीचा
गंध दरवळे
त्यातच मम्
जीवन फुले ...
प्रीतीत रेशीम
बंध जुळले
नजरेला नजरेचे
गुज समजले...
प्रेमाचे नाते
घट्ट विणले
प्रीतीच्या वेलीवर
फुल फुलले...