तुझी माझी प्रीत
तुझी माझी प्रीत
तुझ्या समवेत गाते
जीवनाचे गीत
संध्यासमयी फुलली
तुझी माझी प्रीत।।
तूच माझ्या
आयुष्याचा मीत
निरंतर राहो
तुझी माझी प्रीत।।
सुख-दुःख पाठोपाठ
हीच जीवनाची रीत
शेवटच्या वळणावर सोबत
तुझी माझी प्रीत।।
परंपरेच्या लढ्यात
झाली आपली जीत
झुकणार नाही कधी
तुझी माझी प्रीत।।