STORYMIRROR

Varsha Bhole

Others

3  

Varsha Bhole

Others

गृहिणी

गृहिणी

1 min
11.9K


सर्वांसाठी राबते

 घरासाठी कष्टते 

मानमर्यादा जपते 

हवे नको ते पाहते 

ती असते गृहिणी ।।

स्वतःची भूक

 बाजूला ठेवते 

बाळाला पहिले

 घास भरवते 

ती असते गृहिणी।।

 इच्छेला आपल्या 

मारून टाकते 

घरातल्यासाठीच

 सर्व काही करते 

ती असते गृहिणी ।।

पतीच्या इच्छेचा

 आदर करते 

मुलांनासुद्धा

 सांभाळून घेते 

ती असते गृहिणी ।।

सासर माहेर 

दोन्हीला जपते 

नात्यामध्ये 

प्राण भरते 

ती असते गृहिणी ।।

घराला सुद्धा 

घरपण देते 

आपल्या अस्तित्वाने

 संसार फुलविते 

ती असते गृहिणी।।

 बाहेरही आपले 

कर्तृत्व सिद्ध करते 

ज्ञानात आपल्या

 भर घालते 

ती असते गृहिणी ।।



Rate this content
Log in