स्मितहास्य
स्मितहास्य

1 min

12.1K
करताच पाहून माझ्याकडे स्मितहास्य
मनात प्रेमाचे फुटले कारंजे
मन हे माझे तुझ्यात गुंतले...
हरवले मी माझेच भान
आता फक्त तुझीच जाहले
आयुष्य माझे तुझ्यावर ओवाळले...
नजरा चुकवून तुझे ते स्मितहास्य
पाहता स्वप्नात मी मग्न झाले
मज न कळाले मी तुझी केव्हा झाले...
छंद लागला मज आता तुझाच
प्रीतीत तुझ्या आता रोज न्हाणे
रोज गाऊ आता प्रेमाचे नवे तराणे...