STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy

4  

Rohit Khamkar

Tragedy

प्रेमाचं प्रेत

प्रेमाचं प्रेत

1 min
384

काळ लोटला खूप, तरी सारं आठवत आहे

जगण्यातली सगळी काळचित्रे, जशीच्या तशी पहात आहे


पाहण्याचं काय, तेव्हाही तुलाच पहायचो

एकाच पुस्तकात, एकच पान वाचायचो


वाचत होतो तुला, सतत एखाद्या विषयाप्रमाण

उलगडत होतीस तशी तू, प्रशस्त विश्वासमान


विश्वच होतीस तू माझं, एक वेगळेच जणू

जगायचो बिनधास्त, आनंद मिळायचा मनाच्या अनू


मनाचं काय, माझं असून तुझं होतं

तूझ्या प्रत्येक आठवणीवर, माझ्या मनाचं प्रेत होतं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy