STORYMIRROR

manasvi poyamkar

Romance Abstract

5.0  

manasvi poyamkar

Romance Abstract

प्रेमाची विनंती

प्रेमाची विनंती

1 min
2.7K


एकच प्रश्न आहे वेड्या प्रियकराचा

विचारायची देशील का अनुमती

आयुष्यभराची संगिनी बनवायची आहे तुला

करतो प्रेम स्वीकारण्याची विनंती

मधुचंद्राच्या मधुर राती

तुझा हात हाती असावा

खांद्यांवर डोकं ठेवून तुझ्या

घेईल आहे दोन क्षणांचा विसावा

बोलशील का त्या रात्री तुझ्या मनाचे

खोलशील का दार तुझ्या अंतरीच्या स्वप्नांचे

ऐकशील का निवांत होऊन

गुज माज्या स्पदनांचे

आयुष्याच्या वाटेवरती

सुखदुःखात होऊ सोबती

देशील का ही साथ निरंतर

स्वीकारशील का ही प्रेमाची विनंती


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance