"प्रेमाची रिमझिम"
"प्रेमाची रिमझिम"
तेव्हाचा तो पाऊस
होता मज फार खास
सखीची होती सोबत
आनंद मिळे भिजण्यात
पावसाची पडे वरून सर
प्रेमाला येई पुरता बहार
हातात हात आम्ही दोघे घालून
चालावे पावसाला सोबत घेऊन
आताही येतो तसाच पाऊस
आठवणीने जीव होई कासावीस
माझी सखी गेली फार दूर
माझा जीवनाचा हरवला सूर

