प्रेमाचा रंग
प्रेमाचा रंग
रंगले आधीच मी
तुझ्या प्रेमरंगात
रंगवितोस मग कशाला
या होळीच्या रंगात
तू तर मज बेधूंद
प्रेमाचे दान देतोस
मग कशाला माझ्यास्तव
पळसफूलांना रंग मागतोस
धूळवडीचा सण आजचा
रंगाची तर मजाच न्यारी
पण तुझ्यावीना अपुर्ण वाटे
रंगाची ही अपूर्व होळी
ये लवकर निघूनी तु
उधळ मजवर गुलाल गुलाबी
तुझ्या रंगाने रंगवून मला
दे नशा धुंद शराब

