STORYMIRROR

Kirti Borkar

Tragedy

3  

Kirti Borkar

Tragedy

प्रेमाचा झोका

प्रेमाचा झोका

1 min
336

दूर जाताना एकदा

तू वळून बघायचं होतं

माझं तुझं नातं

थोडं जपायचं होतं


हाक मारायचं होतं

पाठ फिरवली तू

गुपित अश्रूंना तुझ्या

थोडं समजायचं होतं


काय हरवलं आपल्यात

एकदा सांगायचं होतं

धरला होता तू अबोला

कारण तोडायचं होतं


तुला हसताना बघून

थोडं गोंधळायचं होतं

तुझ्याजवळ येऊन

तुला ओळखायचं होतं


तूच माझे काळीज 

मी काळजाचा ठोका

असाच होता आधी

आपल्या प्रेमाचा झोका


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy