प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
प्रेमा तुझा रंग कसा
ज्यात आहे अनेक रंग
राग लोभ अती सालस
गोंधळ घाली करती जंग..!!
वेडे मन हे पाखरू होई
उंच उडते निळ्या नभी
भेटीसाठी तडफडताना
फडफड होते अंतरगाभी..!!
कधी कधी मन हसते
कधी कधी मन रडते
श्वासाच्या लहरीमध्ये
अलवार तरंगत असते..!!
मेंदीचा तो मंद सुगंध
श्वासांचा दरवळ भरतो
प्रेमाच्या सागर लाटावर
डुंबून डुंबून स्वप्न गिरवतो..!!
वेलबुट्ट्यांच्या नक्षीमध्ये
प्रेमाची वीण विलसत असे
रुप लावण्य आरशात जणू
लपूनी छपूनी रमत असे..!!
दूर सनईचा सुर ऐकता
कोमल हृदयाची मूढगती
श्वासाचे मग अलवार गीत
गीत काळजाची धून होती..!!

