STORYMIRROR

Subhash Charude

Romance

3  

Subhash Charude

Romance

प्रेम

प्रेम

1 min
13.8K


प्रेम म्हणजे काय असतं?

पवित्र्याचं नाव असतं

चारित्र्याचे गाव असतं

भक्ति मधील भाव असतं

हृदयातील ठेव असतं

प्रेम म्हणजे काय असतं?

फुलातील सुगंध असतं

नात्यातील स्नेह बंध असतं

वासनेला प्रतिबंध असतं

कलाकाराचा छंद असतं

प्रेम म्हणजे काय असतं?

धर्मातील ग्रंथ असतं

माणसातील संत असतं

पाप्यातील पुण्यवंत असतं

पूजेतील एकदंत असतं

प्रेम म्हणजे काय असतं?

जीवनाचे मर्म असतं

माणुसकीचा धर्म असतं

कर्मातील सत्कर्म असतं

पवित्र्याचा यज्ञकर्म असतं

प्रेम म्हणजे काय असतं?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance