STORYMIRROR

vaishali Deo

Abstract

4  

vaishali Deo

Abstract

प्रेम

प्रेम

1 min
343

  प्रेमाचे रंग गहिरे

  वेगवेगळ्या छटां मधले

  कधी गुलाबी तर कधी लाल

  भावतरंग उमटवणारे,

  हृदयातल्या भावनांना

  हलकेच जागवणारे

  दिल्या घेतल्या वचनांना

  सांभाळून घेणारे

  मनाच्या क्षितिजावर

  दूरवर पसरलेले

  त्या रंगांमधे 

  अनेक भावना गुंतलेल्या

  प्रेमाच्या नात्यांमधला

  गोडवाही लपलेला

  प्रेम ही भावनाच गहिरी 

  कधीच न समजणारी 

  राधा कृष्णाच्या नात्या सारखी

  मिरेच्या अबोल भक्ती सारखी

  प्रेम ही भावनाच निराळी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract