प्रेम
प्रेम
प्रेम समजली तर भावना
झाला तर खेळ
बनवलं तर आयुष्य
प्रेम हे प्रेम असते....
प्रेमात कधी बागडाव वाटते
प्रेमात कधी गुदमरायला होते
प्रेम हे प्रेम असते....
प्रेम काहीनां जवळ आणते तर
काहींना एकमेकानंपासून तोडते
प्रेम हे प्रेम असते....
प्रेम काहीनां यशाच्या शिखरावर नेते तर
काहींची आयुष्य उध्वस्त करून टाकते
प्रेम हे प्रेम असते....

