प्रेम
प्रेम
जेंव्हा एकमेकांच्या नजरा भिडतात
तेंव्हा प्रेमाच्या घटना घडतात I
जेंव्हा एकमेकांच्या एका झलक साठी रोजच प्रवास
तेंव्हा खऱ्या प्रेमाच्या गोष्टी घडतात |
जेंव्हा एकमेकांच्या भेटी घडतात
तेंव्हा प्रेमाच्या मिठी पडतात ।
जेंव्हा एकमेकांच्या मिठी पडतात
तेंव्हा प्रेमाच्या नको त्या गोष्टी घडतातI
जेंव्हा एकमेकांच्या भेटीत ह्रदय भिडतात तेंव्हा प्रेमाच्या उत्पत्तीच्या घटना घडतात ।
जेंव्हा एकमेकांच्या प्रेमाच्या अस्तित्वाच्या नजरा भिडतात
तेंव्हा प्रेमाच्या नात्या साठी लग्नासारख्या गोष्टी घडतात ।
जेंव्हा एकमेकांच्या प्रेमा साठि पति- पत्नी नाते भिडतात
तेंव्हा प्रेमाच्या नावे संसार सारे घडतात I
जेंव्हा एकमेकांच्या प्रेमासाठी संसाराची सारी स्वप्ने पडतात
तेंव्हा प्रेमाच्या स्वप्ना साठी सारी कर्तव्य घडतात|
जेंव्हा एकमेकांच्या नजरा कर्तव्यासाठी भिडतात
तेंव्हा प्रेमाच्या नात्याच्या अस्थित्वासाठी च साऱ्यांची आयुष्य घडतात I
जेंव्हा एकमेकांच्या नजरा आयुष्याच्या शेवटी भिडतात
तेंव्हा प्रेमाच्या अंतिम समयाच्या शेवटच्या घटना घडतात |

