STORYMIRROR

Prradnya Gopale

Romance Others

4  

Prradnya Gopale

Romance Others

प्रेम

प्रेम

1 min
163

तु श्वास माझ्या जगण्याचा

तु ध्यास माझ्या जीवनाचा

तु आस माझ्या मिलनाची

तुच दिशा जगण्याची..


तु संगीत मी गीत

प्रेमाच्या इतिहासातले

सुरात आहे गुंफले

गीत नवे हे जीवनातले..


आयुष्याच्या वळणावरती 

नवे बंध साकारले

प्रेमाने आज तुझे मला

अस्तित्व जसे नवे दिले..


तु बोल माझ्या शब्दांचे

तु श्वास माझ्या प्राणाचे

तु काव्य माझ्या रचनेचे

तुच अक्षर माझ्या भावनेचे..


तु सुगंध मी गंध

प्राजक्ताच्या फुलांचा

दरवळे हळूच मंद

आसमंतात सुगंधाचा.. 


तु थंडगार लाट

वार्याच्या शितलतेची 

डोहातील आठवांच्या

एकांतातील क्षणांची ..


तु सत्य तु शेवट

आयुष्यातील वळणाचा

क्षणा क्षणाला आधार

फक्त तुझ्या सहवासाचा..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance