आठवांचे सुर..
आठवांचे सुर..
1 min
218
तुला साद घालते
आठवांच्या सुरांनी
ही मधुर बासरी
स्पंदनाची वाजवूनी..
गीत नवे गाऊनी
मनाच्या तालावरी
तुझ्याचसाठी धरते
ताल या ठोक्यावरी..
श्वासा श्वासात या
तुलाच शोधते मी
ह्रदयाच्या स्पंदनात
तुलाच जाणते मी..
आठवांच्या हिंदोळ्यावर
झुलता तुझ्या सवे मी..
आठवती क्षण सारे
असतांना तुझ्यासवे मी..
नीर डोकावला तीरी
विरह दावूनी क्षणाचा
हुंदक्याने घेतला प्राण
ठोका चुकवूनी ह्रदयाचा..
