प्रेमातील आठवणी..
प्रेमातील आठवणी..
पाऊस सुरू झाला कि,
मन.. आठवणीत भिजायला
हळुहळु नाचायला लागते
मग.. स्वतःतच रमते..
पावसाच्या पाकळ्यांना
ओंजळीत झेलत,
हलकेच गोंजारून चेहर्याला
स्पर्श करुन कवेत घेते..
ओल्या सुंदर बटांतून
गालावर ओघळणार्या
थेंबांनी, घेतलेल्या मुक्याला
हलकेच लाजत स्वतःला सावरते..
आठवणीतल्या आठवणींना
आठवुन, मन.. चिंबचिंब भिजल्यावर
प्रेमातल्या त्या अनमोल क्षणांना,
नयनातील डोहात विलीन करते..
वार्यासंगे आलेल्या
ओल्या मातीच्या गंधात
त्या सुगंधि क्षणांना
कुरवाळत हरवुन जाते..
शब्दांच्या सुमनांना
काव्य रचनेत गुंफून
प्रेमातील आठवणींंना
कवितेत सजवते..
या प्रवासात जगतांना
ओघळणार्या अश्रुंना
यथेच्छ पावसात भिजवून
अधीर मनाला, अंती शांत करते..