STORYMIRROR

Prradnya Gopale

Romance

4  

Prradnya Gopale

Romance

प्रेम ती भावना

प्रेम ती भावना

1 min
1.1K

प्रेम ती भावना

मनाला भिजवणारी..

चिंब झालेल्या शब्दांना

अबोल करणारी..


बेधुंद मनाला लाजवणारी

नयनांनी बोलणारी..

गाली गोड खडी पाडून

सुखाच्या क्षणांना हासवणारी..


शब्दांना लाजवून 

मुक्याने बोलणारी..

चैतन्यदायी क्षणांची

उधळण करणारी..


कवी मनाच्या कागदावर

रेखाटून कविता बनणारी..

गीत बनून गुणगुणारी

सुरांना गीत बनवणारी..


सार्या जगाचा अर्थ फक्त

दोन शब्दांत एकवटणारी..

मैत्रीला एकत्र बांधून

'प्रेम' नाव देणारी..


ह्रदयात दोन मनांना जोडणारी

रेशीमगाठीचे बंध जोडून

ऋणानुबंधाला जपणारी..

नात्यांच्या ऋणानुबंधाला जपणारी..

अशी ही प्रेमाची भावना..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance