STORYMIRROR

Prradnya Gopale

Romance

4  

Prradnya Gopale

Romance

तुझी माझी भेट

तुझी माझी भेट

1 min
644

तुझी माझी भेट क्षणिक सुखांची

सुखाच्या क्षणांनी हळुवार नटलेली..

तुझी माझी भेट सुगंधित क्षणांची

सुगंधित क्षणांच्या फुलांनी गंधाळलेली..

तुझी माझी भेट अनमोल प्रितीची

प्रेमाच्या निर्झर खलखलत्या झऱ्याची..

तुझी माझी भेट अबोल बोलीची

मुक्तपणे मनातुन मनाला स्पर्शणारी..

तुझी माझी भेट अव्यक्त प्रेमाची

न बोलताही सारे काही बोलणारी..

तुझी माझी भेट निरंतर, जन्मोजन्मीची

अथांग सागरासारखी, अनोख्या नात्याची


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance