प्रेम असते वेडे..
प्रेम असते वेडे..
1 min
249
प्रेम असते वेडे, म्हणतात सारे
चूकीचे नव्हते कधी बोलणारे..
प्रेमाची परिभाषा कधी न जाणली
तुझ्या प्रीतीने हळूवार उमगली..
माझ्या भावनांनी जेव्हा
मलाच प्रश्न विचारले,
गुपित हळूवार त्याचे
असे आता उघडले..
भावना मनाच्या होतात बोलक्या
हसरा चेहरा तुझा आठवतांना..
शब्द राहतात सोबतीला.. तु नसताना
तु असल्यावर.. अबोला येतो त्यांना..
तुझ्या स्वप्नात रमतांना
गातात तीच गाणी..
आपल्या प्रेमाची साक्ष
बनते मग ही,भावनांची वाणी.
