STORYMIRROR

Prradnya Gopale

Others

3  

Prradnya Gopale

Others

मन माझे..

मन माझे..

1 min
197

मन माझे ना आज माझे राहिले

सांग कसे हे तुझ्यात गुंतले..


श्वासाचे भान मज ना राहिले

आज माझी ना मी माझी राहिले..


उभा समोरी तुला आज पाहिले

देहाचे भान मजला ना राहिले..


मन माझे क्षणांमध्ये हरवले

माझ्या अंतरंगी तुला मी पाहिले..


बेभान वारा हा असा थांबला

रोमरोमातूनी जसा बरसला..


चिंब न्हाहले क्षण सुखाने

दरवळे आसमंत या सुगंधाने..


शब्द झाली मुके अबोल फुलांची

फुलता निःशब्द बागेत भावनांची..


लोचनांच्या किनारी भेटली अशी

क्षितिजासम एकरूप जशी..



Rate this content
Log in